About Me

Most Important Current Affairs || चालू घडामोडी-2020 ||

Most Important Current Affairs || चालू घडामोडी-2020 ||
https://www.youtube.com/AHILSLEARNINGZONE
Title of the document


1) रेल्वे स्थानकांत मिळणार्‍या ‘रेलनीर’ या नावाने बाटलीबंद
पाण्याप्रमाणेच एसटी महामंडळाने देखील अशी सुविधा सुरू केली
आहे. एसटी स्थानकात मिळणार्‍या या बाटलीचे नाव काय
ठेवण्यात आले आहे?

योग्य पर्याय निवडा:
1) पेयजल
2) नाथजल
3) प्रियजल
4) नीरजल


=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=


2) जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा अशी बिरूदावली असणार्‍या
‘एकात्मतेच्या पुतळ्या’ चा (सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा)
जाने. 2020 मध्ये खालीलपैकी कशामध्ये समावेश करण्यात
आला आहे?

योग्य पर्याय निवडा:
1) शांघाई सहकार्य संघटनेच्या आश्‍चर्यकारक बाबींच्या यादीत.
2) युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत
3) युनेस्कोच्या अमूर्त वारसास्थळांच्या यादीत
4) संयुक्त राष्ट्रसंघाच्या ऐतिहासिक स्थळांच्या यादीत


=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=


3) के-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राविषयी खाली काही विधाने दिलेली
आहे. ती अभ्यासून योग्य विधाने कोणती ते निवडा.
अ) या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 3500 किलोमीटर आहे.
ब) शिशुमार वर्गाच्या अण्वस्त्र पाणबुड्यांवर या क्षेपणास्त्राची तैनाती
करण्यात येईल.
क) हे क्षेपणास्त्र तीन मीटर लांब असून एक टनापर्यंत अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.
ड) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

योग्य पर्याय निवडा:
1) अ, क, ड
2) फक्त अ, ब
3) अ, ब, ड
4) अ, ब, क, ड


=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=


4) ‘रस्ता सुरक्षा विषयीच्या तिसर्‍या जागतिक परिषदे’ विषयी पुढे
काही विधाने दिली आहेत. त्यातील अचूक विधान/ने निवडा.
अ) नवी दिल्लीमध्ये ही परिषद झाली.
ब) केेंद्रीय रस्ते सुरक्षा व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या
परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व केले.

योग्य पर्याय निवडा:
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ व ब दोन्ही
4) न अ, न ब


=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=


5) लोकपाल यंत्रणेचे बोधवाक्य म्हणून पुढीलपैकी कोणत्या विधानाची br /> निवड करण्यात आली आहे?

योग्य पर्याय निवडा:
1) ईशावास्यम इदं सर्वम
2) यंत्कींच जगत्यां जगत
3) त्येनं तक्तेन भूंजींथः
4) मा गृधः कस्यास्विद धनं



=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=


6) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या विद्यापीठात आठवड्यातील br /> एक दिवस हा ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळला जातो?

योग्य पर्याय निवडा:
1) कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर
2) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
3) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड



=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=


7) अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाबाबत खाली काही
विधाने दिलेली आहेत. ती अभ्यासून योग्य पर्याय निवडा.
अ) 54 वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन हे 18 ते 20
जानेवारी 2020 दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात पार पडले.
ब) या 54 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष प्रा. हेमचंद्र प्रधान हे होते.
क) मराठी विज्ञान परिषदेची स्थापना 1966 साली होऊन याच वर्षी
तिचे पहिले अधिवेशन पार पडले.

योग्य पर्याय निवडा:
1) अ व ब योग्य, क अयोग्य
2) अ योग्य, ब व क अयोग्य
3) अ, ब, क योग्य
4) अ, ब, क अयोग्य



=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=


8) ‘राष्ट्रीय डोंपिंग विरोधी संस्थे’ ने (National Anti Doping Agency : NADA)
असशपलू : छअऊअ) खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याची
सदिच्छादूत म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे?

योग्य पर्याय निवडा:
1) अजय देवगण
2) अक्षय कुमार
3) सुनिल शेट्टी
4) सलमान खान


=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=


9) ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आघाडी’ (International Religious Freedom Alliance) विषयी खालील विधानांचे परीक्षण करा. अ) 5 फेब्रु. 2020 रोजी अमेरिकेच्या पुढाकाराने या आघाडीचा शुभारंभ करण्यात आला. ब) जगातील 27 देश या आघाडीचे संस्थापक सदस्य देश आहेत. क) भारत हा या आघाडीचा संस्थापक सदस्य देश आहे. ड) भारताचे शेजारी देश-पाकिस्तान व बांग्लादेश हे या आघाडीचे संस्थापक सदस्य देश आहेत. वरीलपैकी अचूक विधान/ने निवडा.

योग्य पर्याय निवडा:
1) फक्त ब
2) फक्त अ व ब
3) अ, क, ड
4) फक्त क व ड



=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=0=


10) ‘65 वा फिल्मफेअर पुरस्कार, 2020’ बाबत खालील विधाने
अभ्यासून योग्य विधानांची निवड करा.
अ) या पुरस्कार सोहळ्यात ‘आर्टिकल 15’ या चित्रपटाने दहा पुरस्कार पटकावले.
ब) अभिनेते गोविंदा यांना ‘एक्सलन्स इन सिनेमा’ हा विशेष पुरस्कार
देऊन गौरविण्यात आले.
क) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आदित्य धर यांना देण्यात आला.

योग्य पर्याय निवडा:
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ व ब दोन्ही
4) न अ, न ब


=0=0=0=0=0=0=0=0 Best Of Luck 0=0=0=0=0=0=0=0=



Most Important Current Affairs || चालू घडामोडी-2020 || Most Important Current Affairs ||  चालू घडामोडी-2020 || Reviewed by AHILSSTUDY on May 08, 2020 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.