About Me

लेफ्टनंट जनरलपदी डॉ.माधुरी कानिटकर

लेफ्टनंट जनरलपदी डॉ.माधुरी कानिटकर 
         नवी दिल्ली : लष्करात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळण्यासाठीची एक मोठी लढाई महिलांनी सर्वोच्च न्यायालयात नुकतीच जिंकलेली असताना मेजर जनरल डॉ.माधुरी कानिटकर यांनी अलीकडेच लेफ्टनंट जनरलपदावर बढती देण्यात आली. कानिटकर यांची या पदावरील निवड गेल्यावर्षीच झाली होती, पण जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. या उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहेत. नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या प्रमुख (सीडीएस-वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे. लष्करात या श्रेणीचे पद मिळविणार्या कानिटकर या तिसर्या महिला अधिकारी असून त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. कानिटकर यांचे पती राजीव लष्करात लेफ्टनंट जनरल होते. ते नुकतेच निवृत्त झाले. पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट जनलपद भूषविल्याची ही पहिलीच घटना आहे.
लेफ्टनंट जनरलपदी डॉ.माधुरी कानिटकर लेफ्टनंट जनरलपदी डॉ.माधुरी कानिटकर Reviewed by AHILSSTUDY on March 11, 2020 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.